विश्वास बसणार नाही, पण हवामान बदलाने मुलांचे बालपण धोक्यात आणले आहे!
इतिहासात डोकावले तर लक्षात येईल की, युद्ध, अशांतता, वैमनस्य, दुष्काळ, अवर्षण, मंदीचे सर्वाधिक आणि थेट परिणाम फक्त आणि फक्त महिला आणि मुलांना सहन करावे लागले. दोन देशांतील अंतर्गत वाद असो की, महायुद्ध, यात महिलांचे शोषण झाले आणि मुलांनी आपले बालपण गमावले. ‘हवामान बदल’ अशीच आणीबाणी आहे. फक्त या आणीबाणीकडे गांभीर्याने बघण्याची आणि त्यावर आपणहून काम करण्याची मानसिकता नसल्याने हवामान बदल केवळ चर्चेपुरता उरला आहे.......